प्रशासकीय माहिती

प्रशासकीय माहिती

ग्रामपंचायत अणसूरचे दैनंदिन कामकाज ग्रामसेवक व कर्मचारी वर्ग पाहतो. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कर वसुली, जन्म-मृत्यू दाखले, विविध प्रमाणपत्रे, नोंदी तसेच सरकारी आदेशांची अंमलबजावणी केली जाते. याचबरोबर ग्रामसभा ही गावातील सर्व नागरिकांचा सहभाग असलेली महत्त्वाची बैठक असून गावाच्या विकास आराखड्याचे निर्णय त्यातून घेतले जातात.